Uncategorized
‘आयुष्मान’च्या नावाखाली बालरोगतज्ज्ञाला अरेरावी; साईनाथ घुलेविरुद्ध केज पोलिसांत गंभीर गुन्ह्याची नोंद!
. स्टंटबाजी अन् अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या साईनाथ घुलेची मस्ती जिरली

केज (बीड) : शहरातील वकीलवाडी भागात असलेल्या योगिता हॉस्पिटल व बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या मुलाच्या उपचारावरून हुज्जत घालून, डॉक्टरला धमकी देत वैद्यकीय सेवा देण्यात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच हॉस्पिटलच्या प्रतिबंधित कक्षेत मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ लक्ष्मण घुले (रा. शिरपुरा, ता. केज, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी:
फिर्यादी डॉ. दिनकर रावसाहेब राऊत (वय ४८, व्यवसाय: डॉक्टर, रा. योगिता हॉस्पिटल, वकीलवाडी, केज) यांचे केज शहरात अधिकृत योगिता नर्सिंग होम व बालरुग्णालय आहे. दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० ते १:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी साईनाथ लक्ष्मण घुले हा त्याचा मुलगा श्रेयस साईनाथ घुले याला सर्दी व तापाच्या त्रासामुळे उपचारासाठी बाह्य रुग्ण विभागात (OPD) घेऊन आला होता. डॉ. राऊत यांनी तपासणी करून रुग्णाला ‘Acute Febrile Illness (Viral)’ हा आजार असल्याचे सांगून अंतर्गत रुग्ण विभागात दाखल करून उपचार सुरू केले. उपचाराला बालरुग्णाने चांगला प्रतिसाद दिल ऱ्यादिवशी संध्याकाळी राऊंड घेत असताना डॉक्टरांनी पुढील उपचाराचे निर्देश दिले.
दरम्यान, आरोपी साईनाथ घुले याने मुलाचे उपचार ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ अंतर्गत करून देण्याचा आग्रह धरला. परंतु, सदर आजार योजनेच्या यादीत समाविष्ट नसल्याने नियमानुसार ती सुविधा देता येणार नाही, असे डॉक्टरांनी समजावून सांगितले. यावरून संतापलेल्या आरोपीने डॉक्टरांना दमदाटी व धमकी दिली की, “तुम्ही माझ्या मुलाचा उपचार योजनेमध्ये न बसवल्यास मी तुला बघून घेईल व हॉस्पिटलची बदनामी करेल.”



