Uncategorized
स्मशानभूमीच्या कामाचे बिलच अदा केले नाही तर बदनामी का? चुकीच्या नावाने आरोप करणाऱ्या माजी सरपंच संतोष क्षीरसागर यांच्यावर ग्रामसेवक शशिकांत राऊत ठोकणार १ रुपया २५ पैशांचा अब्रूनुकसानीचा दावा!
मा. रमेशराव आडसकर साहेब तुमची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्याला माहिती घेऊन तक्रार द्यायला सांगा!

केज (प्रतिनिधी): बोबडेवाडी (ता. केज, जि. बीड) येथील कथित ११ लाख रुपयांच्या स्मशानभूमी निधीच्या वादात आता मोठे नाट्यमय वळण आले आहे. या कामाचे अद्याप बिलच अदा केलेले नसताना आणि ग्रामसेवकांचे खरे नावही माहीत नसताना तक्रारदार व माजी सरपंच संतोष क्षीरसागर यांनी कोणतीही शहानिशा न करता बेछूट आरोप केल्याचे समोर आले आहे. व्हायरल पोस्टरमध्ये ग्रामसेवकांचा उल्लेख ‘अंकुश राऊत’ असा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ग्रामसेवकांचे नाव शशिकांत राऊत आहे. या बिनबुडाच्या व बदनामीकारक आरोपांविरोधात माजी सरपंच संतोष क्षीरसागर यांच्यावर न्यायालयात १ रुपया २५ पैसे (१.२५ रुपये) चा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ग्रामसेवक शशिकांत राऊत व ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.
नेमका वाद आणि पोस्टरमधील चूक काय?
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या पोस्टरद्वारे प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले होते:
बोबडेवाडीच्या ११ लाख रुपयांच्या स्मशानभूमीचा निधी कुठे गेला, काम झाले की पैसे खाल्ले गेले, असे प्रश्न उपस्थित करत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जितीन रहेमान आणि गटविकास अधिकारी (BDO) विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली होती
नेते रमेशराव आडसकर यांचे समर्थक संतोष क्षीरसागर यांच्या तक्रारीचा संदर्भ देत, या पोस्टरमध्ये ‘ग्रामसेवक अंकुश राऊत’ यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती
मात्र, गावातील ग्रामसेवकांचे खरे नाव शशिकांत राऊत असताना ‘अंकुश राऊत’ असे चुकीचे नाव छापून आणि निधीचे बिल अदा झाले की नाही याची कोणतीही खातरजमा न करता आरोप केल्याने या तक्रारीतील फोलपणा उघड झाला आहे
ग्रामपंचायत व ग्रामसेवकांची स्पष्ट भूमिका
या प्रकरणी प्रशासकीय आणि ग्रामपंचायतीची बाजू मांडताना खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत:
बोबडेवाडी गावात मुळात स्वतंत्र स्मशानभूमी अस्तित्वात नसताना जिल्हा परिषद बीडकडून स्मशानभूमीच्या नावाखाली रस्ता कसा मंजूर झाला, हाच मूळ प्रश्न आहे.
ग्रामपंचायतीकडे आलेला निधी परत जाऊ नये यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत सभासदांनी रीतसर ठराव घेऊन नियोजन केले. गावातील बहुसंख्य लोकांच्या शेतजमिनी असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात मयताच्या अंत्यविधीसाठी जाण्यास मोठी हेळसांड होत असल्याने जनसुविधा योजनेचा निधी त्या रस्त्यावर वापरण्यात आला.
या कामाचे अद्याप बिलच अदा करण्यात आलेले नाही, तरीही केवळ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय हेतूने आणि नावासह बदनामी करण्याच्या उद्देशाने हे आरोप केले गेले आहेत.
१ रुपया २५ पैशांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार



