राजकारण

आज नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची घेणार शपथ

मंत्री पदाची सांभाव्य यादी आली समोर

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर

आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

कुणाला कोणतं खातं मिळणार याची देशभर चर्चा होतेय. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून फोनाफोनी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला आहे.

महाराष्ट्रातील पाच जणांना मंत्रिपदासाठी फोन

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोणते खासदार असतील याची यादी समोर आली आहे. आतापर्यंत 32 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनाही फोन आला आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांचीही वर्णी लागली आहे महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, अशी माहिती आहे. गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. शिक्षण आणि संस्कृतिक ही मंत्रालय भाजप खासदारांकडे दिलं जाणार आहे. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पद मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या घरी 47 नेतेमित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात, असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्रीही नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात. पोहोचले आहेत नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. नारायण राणे एमएसएमई मंत्री होते, तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. मात्र यंदा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाहीमहाराष्ट्रातून मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?
नितीन गडकरी, भाजप, विदर्भ
– पियुष गोयल, भाजप, मुंबई
– रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र
– मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र
– रामदास आठवले, आरपीआय
– प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ
‘या’ नेत्यांना आले फोन
१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंदी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३१. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
३२. निर्मला सीतारमन,भारतीय जनता पार्टी
३३. अन्नपूर्णा देवी,भारतीय जनता पार्टी
३४. सीआर पाटिल, भारतीय जनता पार्टी
३५. अजय टम्टा, भारतीय जनता पार्टी
३६. एस. जयशंकर, भारतीय जनता पार्टी
३७. जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टी
३८. शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टी
३९. पंकज चौधरी, भारतीय जनता पार्टी
४०. कमलेश पासवान, भारतीय जनता पार्टी
४१. सुधीर गुप्ता, भारतीय जनता पार्टी
४३. हरदीप सिंग पुरी, भारतीय जनता पार्टी
४४. सरबानंद सोनोवाल, भारतीय जनता पार्टी
४५. भुपेंद्र यादव,भारतीय जनता पार्टी
४६. प्रल्हाद जोशी, भारतीय जनता पार्टी

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button