Uncategorized

‘आयुष्मान’च्या नावाखाली बालरोगतज्ज्ञाला अरेरावी; साईनाथ घुलेविरुद्ध केज पोलिसांत गंभीर गुन्ह्याची नोंद!

. स्टंटबाजी अन् अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या साईनाथ घुलेची मस्ती जिरली

 

केज (बीड) : शहरातील वकीलवाडी भागात असलेल्या योगिता हॉस्पिटल व बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या मुलाच्या उपचारावरून हुज्जत घालून, डॉक्टरला धमकी देत वैद्यकीय सेवा देण्यात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच हॉस्पिटलच्या प्रतिबंधित कक्षेत मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ लक्ष्मण घुले (रा. शिरपुरा, ता. केज, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.  

घटनेची सविस्तर माहिती अशी:

फिर्यादी डॉ. दिनकर रावसाहेब राऊत (वय ४८, व्यवसाय: डॉक्टर, रा. योगिता हॉस्पिटल, वकीलवाडी, केज) यांचे केज शहरात अधिकृत योगिता नर्सिंग होम व बालरुग्णालय आहे. दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० ते १:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी साईनाथ लक्ष्मण घुले हा त्याचा मुलगा श्रेयस साईनाथ घुले याला सर्दी व तापाच्या त्रासामुळे उपचारासाठी बाह्य रुग्ण विभागात (OPD) घेऊन आला होता. डॉ. राऊत यांनी तपासणी करून रुग्णाला ‘Acute Febrile Illness (Viral)’ हा आजार असल्याचे सांगून अंतर्गत रुग्ण विभागात दाखल करून उपचार सुरू केले. उपचाराला बालरुग्णाने चांगला प्रतिसाद दिल ऱ्यादिवशी संध्याकाळी राऊंड घेत असताना डॉक्टरांनी पुढील उपचाराचे निर्देश दिले.  

दरम्यान, आरोपी साईनाथ घुले याने मुलाचे उपचार ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ अंतर्गत करून देण्याचा आग्रह धरला. परंतु, सदर आजार योजनेच्या यादीत समाविष्ट नसल्याने नियमानुसार ती सुविधा देता येणार नाही, असे डॉक्टरांनी समजावून सांगितले. यावरून संतापलेल्या आरोपीने डॉक्टरांना दमदाटी व धमकी दिली की, “तुम्ही माझ्या मुलाचा उपचार योजनेमध्ये न बसवल्यास मी तुला बघून घेईल व हॉस्पिटलची बदनामी करेल.”  

तसेच, ऑन ड्युटी सिस्टर मंगल मल्हारी मस्के व ज्योती अरविंद समुद्रे यांच्या उपस्थितीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बालरोग कक्षामध्ये व आयसीयूच्या समोरील संवेदनशील क्षेत्रामध्ये मोबाईलद्वारे विनापरवानगी चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) केले. हॉस्पिटलमध्ये लहान मुले व माता असतानाही प्रतिबंधक क्षेत्रात चित्रीकरण करण्यास मज्जाव केला असता, आरोपीने कर्मचाऱ्यांना व डॉक्टरांना दमदाटी करत हुज्जत घातली. तसेच उपचाराचे कागदपत्र आणि फायली घेऊन हॉस्पिटलचे बिल न भरता निघून गेला व सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.  

या प्रकरणी डॉ. दिनकर रावसाहेब राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-टक त्याती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४ सह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३५२, ३५१(२), ३५६(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळसाहेब शाहूराव रोडे हे करत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button