सामाजिक

पक्षाप्रमाणे भुर्ररकून उडून चालली माणसं

धन दौलत हे क्षणभंगूर आहे कामापुरतीच कमवा

 

डोंगरा आड गेलेला माणूस परत येतो. ढगा आड गेलेला माणूस परत येत नाही.

का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना.. कित्येक स्वप्न तशीच सोडून. ढगाआड !!

माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात. पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना छळतात.

सत्ता, संपत्ती, अहंकार, ईप्यां, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल.

आपले प्राधान्यक्रम चुकले आहेत. एकमेकांत स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा झाली.

नको त्या गोष्टीना नको तितकं महत्व देणारी,

किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच आहेत.

माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही.

फुलपाखरा सारखं क्षणभंगुर जगणं झालंय.

त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंतच माणसांनी माणसाशी माणसासारखंच यागलं पाहिजे.

मी का माघार घेऊ ?

मी का फोन करू ?

मी का कमीपणा घेऊ ?

हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला- घेतला पाहिजे.

माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, रडलो तरीही तो ते कधीच पाह शकत नाही की त्याला कोणी सांगू ही शकत नाही…

म्हणून म्हणतो मित्रांनो, जिवंतपणी एकमेकांना प्रेम द्या, आधार द्या, मदत द्या, दिलासा द्या.. नात्याला महत्व द्या.

हा जन्म पुन्हा नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button