सामाजिक

नेत्यानों विकासाचा टाहो फोडु नका लोकसभा विधानसभा झाली आता विकास करायला हवा

आष्टी पाटोद्यात मोर्चा अंबाजोगाईत चर्चा केज मधे खुर्च्या

केज :- केज शहरात जवळपास ५०३ सर्वे नंबर व ४००० खातेदार शेतकरी आहेत आहेत त्यातील फक्त ५० सर्वे नंबर मधे शहरमधले नागरीक राहतात बाकी ४५० सर्वे नंबर मधे शेतकरी आहेत केज २००९ पासुन ते आज पर्यत नगरपंचायत झाल्यापासुन या शेतकरी बांधवाना शासनाची कोणतीही योजना मिळत नाही ना धडक ना कडक विहीर ना गायगोटे असे बरेच योजने पासुन शेतकरी वंचीत आहेत विकास म्हणजे रस्ते लाईट नाली यालाच फक्त विकास म्हणायचा का ?

देश स्वतंत्र झाल्यापासुन रस्ते नाली अन पाण्यापासुन विकास पुढे जाता जाईनाच गेलाय यांचा पण सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी नी विचार केला पाहिजे केज ला नगरपंचायत झाली हाच विकासाला लागलेला प्रचंड शाप आहे २०१२ ला केज शहराचा विकास आरखडा तयार केला पन अन केज शहरातील शेतकर्याच्या शेतावर विविध आरक्षण टाकुन त्यांना मावेजा देण्याचे लांबच राहीले पन त्यांना अडवण्याचे काम नगरपंचायत करत आहे यामधे केज शहरात दोन खासदार एक आमदार आहेत पक्षीय राजकारण सोडून पहिले केज शहरातील विविध आरक्षण टाकलेल्या शेतकर्याना मावेजा दिला पाहीजे व केज शहरातील ५० सर्वे नंबर बंद करुन त्यांना पि आर कार्ड दिले पाहीजे आज गुंठेवारीने जनता त्रस्त आहे जिरायत खात्याची जमिनीवर व्यापारी गाळे बांधायला हवे श्रेय वादासाठी जनतेला मारु नका केज शहराची गावठानाची हद्द वाढवुन जनतेला सुख:द धक्का दिला पाहीजे व नगरपंचायत हद्दितील शेतकर्याना शासनाचा सर्व लाभ मिळाला पाहीजे आता दोन चार दिवसात सरकार स्थापन होईल दोन्ही खासदार विरोधी पक्षाचे आसल्यामुळे त्यांची कोणतीही मागणी मान्य होईल हे सुतरामाची शक्यता नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या वर ही जवाबदारी आहे अन त्यांनी कोणतेही विकासाचे कामे आणले तर त्यांना विनाकारण विरोध करु नका सर्व नेत्यांनी विकासाचे कामे आणले तर केज शहरातील जनता स्वागत करेल जो विरोध करेल त्यांचे पन येथेच्छ स्वागत करायला जनता तयार आहे
पाणी अडवा पाणी जिरवा हा शासनाचा उपक्रम भारी आहे पन या पक्षीय राजकारणामुळे विकासाच्या एैवजी माणसे अडवा तेथेच जिरवा हा उपक्रम चांगलाच राबवताना दिसत आहे पन जनतेला धिर दम आसतो यामुळे विकासाच्या कामावर भर द्या जनतेला गुत्तेदारी नको उमेदवारी नको जातीयवाद नको मग धरपड कशासाठी करतात हिशोबाच्या गणितासाठी फरपट कशामुळे करतात पहिली जुनी म्हण आहे त्यांचा अभ्यास करावा आष्टी पाटोद्यात मोर्चा अंबाजोगाईत (रिंगल)चर्चा केज मधे खुर्च्या तीच परिस्थिती आहे दोन खासदार केज ला लाभलेले आहेत व जोडीला आमदार आहेत केज मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलु शकतात पाच वर्ष आता निवडणुक नाही जिरवा जिरवी पेक्षा वरील विकासाच्या कामावर भर द्या आम्ही विकास करणारे नेत्यासोबत आहेत राहु अन राहणारच

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button