सामाजिक

स्व. संतोष देशमुख सारख्या व्यक्तिमत्त्वाची ग्रामीण भागाला, समाजाला गरज

हत्येतील आरोपी मोकाट

केज:-गाव, समाज व तरुण वर्ग सुधारू पाहणाऱ्या ‘संतोष देशमुख’ सारख्या उमद्या नेतृत्वाच्या विरोधात कायमच इथल्या व्यवस्था आणि एकाधिकारशाहीतील राजकीय लोक असतात. त्यातूनच त्यांचा निर्घृण खून झाला आणि त्यामुळे कुटूंबापासून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे. त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडलेले असताना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्यापासून बीड जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना मायेचा हात दिला आहे. परंतु त्यांचा खून करणारे गुंड अजूनही जेरबंद होत नाहीत, याचे दुःख आहे. अशा निडर संतोष देशमुख यांचा खून व्हावा, यापेक्षा आमचे दुर्भाग्य तरी काय?

संतोष देशमुख सारख्या व्यक्तीमत्वांनी गाव आणि समाज सुधारू पाहणे हे इथल्या कुठल्याही प्रस्थापित्यांना कायमच खुपते. आम्हीही सत्तेत होतोत, पाच वर्षे सत्ता असलेल्या १५ हजार लोकसंख्येच्या बारड गावामध्ये माझ्या सहकाऱ्याच्या सहाय्याने मी पाच वर्षे पोलीस स्टेशन डायरीत एकही गुन्ह्याची नोंद होऊ दिली नाही, इतका सामाजिक एकोपा जपला. तरुण, जेष्ठ यांना सोबत घेऊन सामाजिक वातावरण कसे सलोख्याचे राहते आणि त्यामाध्यमातून गावचा निकोप विकास साधला. सर्वांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अधिकार जोपासले. सण २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायतवर जुने व चालू असे ६०-६५ लाख रुपयांचे वीजबिल थकीत असताना एका योजनेतून ते ३२ लक्ष रुपयांवर आणले. व ती सर्व वीजबिल रक्कम लोकसहभागातून भरली. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र भारनियमात अडकलेला होता, महाराष्ट्रात बारड हे पहिलें गाव होते जे ‘भारनियमन’मुक्त झाले होते.

तसेच तरुण व इतर नागरिक दारू पासून दूर राहावेत याकरिता गावात इतिहासात पहिल्यांदा “अडवी बॉटल” असे मतदान पण घेतले, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. यापेक्षा मी वेगळे काय करू शकणार होतो. अनेक तरुण व कुटुंबाना तेव्हाही आणि आत्ताही दारू पासून बाहेर काढले आताही काढण्याचा प्रयत्न करतोत, हे आपले सर्वांचे उत्तरदायित्व आहे. आम्ही काही वेगळे काम करत नाही, केले नाही.

तसेच गावात १९५ मुले कुपोषण बाधित आढळले. त्यावरही उपाय म्हणून लोकसहभागातून पैसे व अन्न गोळा करून त्या सर्व मुलांना बाहेर काढले. आम्ही दर महिन्याला गावात ग्रामसभा व तंटामुक्त बैठक घ्यायचो. निकोप लोकशाहीचा तो काळ होता. सर्वांना बोलण्याचा अधिकार मिळवून दिला होता. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार होता. आजकाल कागदावरच्या ग्रामसभा आपण पेपर मधून ऐकतोत. इतके सगळे काम करूनही लोक जेव्हा तुमच्या सोबत नसतात, तेव्हा त्याचे दुःख होते. व्यवस्था बिघडल्यात म्हणजे काय ? याचा विचार लोकांनीच करावा! लोक सोबत असोत नसोत, आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन कालही लोकांच्या कल्याणासाठी होतोत, पुढेही राहू. जीवन संपतांना स्मशानभूमीत व्यक्तीमत्वांची व्याख्या लोकांकडून होत असते. आज संतोष देशमुख बद्दल लोकांच्या जुन्या प्रतिक्रिया येत आहेत, गाव व समाज सुधारू पाहणाऱ्या अशा मुलाचा खून होतो तेव्हा कुठेतरी आमची वाटचाल विकृतीकडे आहे, विनाशाकडे आहे असा त्याचा अर्थ होतो.

आजही अनेक गावांत चांगली तरुण आहेत, जी गावाचे भले व्हावे यासाठी प्रयत्नात असतात. पण स्वर्गीय संतोष देशमुख सारख्या कुठल्याही व्यक्तिमत्त्वाना गावचा विकास करताना अनेक अडचणी आणल्या जातात. निकोपपणे काम करू दिले जात नाही. त्यामुळे आपल्या थोड्याशा चूका गावचे भविष्य धोक्यात आणते. त्यामुळे मित्रांनो संतोष देशमुख सारखे नेतृत्व प्रत्येक गावात जोपासले पाहिजे. एकाधिकारशाही फक्त भय निर्माण करते, त्याचे परिणाम उद्या समर्थक लोकांनाही भोगावे लागतात, पण त्यास ते परिणाम उशिरा कळतात, पण तोपर्यंत वेळ होऊन गेलेली असते. तेव्हा हा धोका वेळीच ओळखला पाहिजे. तेव्हा नागरिकांनो तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, याचा विचार व्हावा! आपल्या गावातून मुंबईत किंवा बाहेर गावात कामाला गेलेले लोक सुद्धा, कुणाच्या तरी आमिषाला बळी पडून एक दिवस गावात येऊन गावचा विकास, भले करू पाहणाऱ्याच्या विरोधात मतदान करतात, आणि लगेच निघून जातात. पण गावचे काय ? तुम्ही मुंबईत किंवा इतर शहरात असता आणि गाव गुंडांच्या हातात देऊन जाता ? याचाही विचार सर्वांनी करावा!!

मित्रांनो, सज्जनांनो, आज संतोषजी तर गेले, त्याचे दुःख कायम असणार आहे. पण आपला ग्रामीण भाग पुढे न्यायचा असेल, सामाजिक सलोखा ठेवायचा असेल, सर्वांना खुले स्वातंत्र्य हवे असेल आणि त्यामाध्यमातून शाश्वत विकास साधायचा असेल तर निडर, निकोप, प्रामाणिक राहिलेल्या संतोष देशमुख सारख्या इथल्या तमाम व्यक्तीमत्वाच्या मागे कायम उभे रहा, अन्यथा कुणीतरी ‘वाल्या’ तुमच्या गावचा पालापाचोळा करेल आणि स्वतःच घर मात्र भरेल, हे नक्कीच!

तेव्हा विचार करा मित्रांनो! संतोषजी आपण ग्रेट होतात, तुमचे बलिदान शब्दात वर्णिले जाऊ शकत नाही. तुमचा प्रामाणिकपणा सर्वांच्या अंगी यावा, हिच अपेक्षा!

प्रताप देशमुख बारडकर
9511242491
तालुकाध्यक्ष, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button