सामाजिक
वाटुन दिलेली संपत्ती आई वडिलांना परत घेता येणार
वयोवृद आई वडिलांना सांभाळ न करणारे वारसाना सरकारचा दणका

छत्रपती संभाजीनगर :-मराठवाड्याचे विभागीय आयूक्त मधूकरराजे आर्दड यांनी ८ जिल्हात जेष्ठाच्या हक्कासाठी परिपत्रक काढले आहे आई वडिलांनी आपल्या वारसाना वाटणी करून दिल्यावर म्हतारपणी आई वडिलाना सांभाळ करत नसल्याचे बरेच ठिकाणी दिसुन आलेले आहे त्या अनुषागाने विभागीय आयूक्ताने राज्यामधे प्रथमच हा प्रथमच प्रयोग ८ जिल्ह्यात राबवला आहे तरी उतार वयात वारसाच्या आधाराची गरज आसताना जेष्ठाचा सांभाळ न करणारे वारसाच्या नावावरची संपत्ती परत घेण्यासाठी तलाठी किंवा जिल्हाधिकारी कडे अर्ज करता येऊ शकतो संबंधीत वारसाना नोटीस देऊन समोरासमोर सुनावनी होणार आहे जर तक्रारी अर्जात तथ्य आढळल्यास वाटून दिलेली संपत्ती परत आई वडिलांच्या नावे होणार आहे तरी जेष्ठ मंडळीनां वारस सांभळ करत नसतील त्यांनी लवकर तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कडे तक्रारी अर्ज करू शकता
या मालमत्ता हक्क बाबत ८ जिल्ह्यासाठी परीपत्रक जारी करण्यात आले आहे
राज्यात यांची अंमलबजावनी करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यकार्यकारी आधिकारी तालूका स्तरावर पंचायत समिती गटविकास आधिकारी यांनी वेळी आढावा बैठक घ्यावी असे आदेश विभागीय आयूक्तानी दिलेले आहेत या परीपत्रकाची जनजागृती नसल्यामूळे अजून अर्जाची संख्या कमी आहे
सावधान आजोबा आज्जी किंवा आई वडिल यांचा सांभाळ न केल्यास वारस लवकरच होणार बेघर भूमिहीन



