क्राईम

मराठ्यांचा संयमाचा अंत पाहू नका मनोज जरांगे पाटलाचा मस्साजोग येथुन सरकारला इशारा

आरोपीना पाठिशी घालणारे पि.आय.महाजन पोलीस निरीक्षक राजेश पाटील हत्या प्रकरणी दोषी आसल्याची जनभावना

 

केज :- तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच मराठासेवक संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला.

आरोपींना तात्काळ अटक व्हावी, प्रकरणाची CID चौकशी व्हावी व जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी कालपासून मस्साजोग येथे शांततेत रास्तारोको सुरु आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी येथे भेट देऊन देशमुख परिवाराचे सांत्वन केले व आंदोलकांच्या मागणीला बळ दिले.

विषय :-मस्साजोग येथे अवादा कंपनीचा मोठा पवनचक्की प्रकल्प उभा राहत आहे. धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असलेले गावगुंड नित्याने हप्ते मागण्यासाठी येतात. मागील आठवड्यात या गावगुंडांनी कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी मस्साजोग येथील कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर त्या गुंडांवर गुन्हा नोंद झाला, अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी  पोलीसाच्या मेहरबानी मुळे  जामीनही मिळाला. बाहेर येताच या गुंडांनी प्रकरणाचा राग मनात धरून सरपंचांचे अपहरण करून खून केला. इतकी गुंडगिरी बोकाळली आहे. राजकीय वरदहस्तामुळे गुंडांना पोलीसाच्या सहकार्यामुळे  कायद्याची भीती राहिली नाही.

महाराष्ट्रातील बहुतांश गावांत मराठा बहुसंख्य आहे परंतु मराठा सहिष्णू आहे. कोणावरही अन्याय करीत नाही. सर्वांशी बंधुभाव जपतो. परंतु बीड जिल्ह्यात मुंडे परिवाराने ठराविक जातीचेच अधिकारी, पोलीस नेमून ठरावीक जातीच्या गावगुंडांना पोषक वातावरण बनवले आहे. गुंडगिरी, माफिया, हप्तेवसुली करणाऱ्यांना पाठबळ दिले आहे. विकास तर  सोडाच  गोरगरीबाच्या हातातला कोयता सोडवता   आला नाही. पण बीडचा बिहार बनवला आहे.

मस्साजोग येथील आंदोलन तात्पुरते स्थगित

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ खालील मागण्यांसाठी कालपासून गावात शांततेत २७ तास रास्तारोको सुरु होता.

मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या
१. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी
२. आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना सहआरोपी करावे
३. केजचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी करावे
४. हे प्रकरण CID कडे हस्तांतरित करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे
५. घटनास्थळाचे आय विटनेस शिवराज देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे

पोलीस अधिक्षक बारगळ साहेबाचे उत्तर

– सर्व आरोपींना ३ दिवसांत अटक केली जाईल
– पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबन करण्यात आले असून, निरीक्षकांच्या निलंबनाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण केली जाईल
– प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले जाईल
– सरकारी वकील नेमले जातील

प्रशासनाने सर्व मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्यानंतर प्रेताची विटंबना टाळण्यासाठी व अंत्यविधी करण्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मस्साजोग ग्रामस्थ व मनोज जरांगे पाटलाचे  प्रतिउत्तर

पुढील ३ दिवसांत जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि दगा झाला तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने मोठे आंदोलन उभा केले जाईल. पण आमच्या बांधवाला १००% न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशारा  मस्साजोग ग्रामस्त  मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button