सामाजिक

पैसा समृद्धी असुनही रिकामी मने-

आत्महत्या का करतात प्रसिद्ध लोक...

जिवनामधे आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी, समाजात मान-सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो, त्याचं जीवन सुरक्षित असतं. पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते. अगदी उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते – त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

अलीकडच्या काही घटना:

डॉ. वळसणकर (सोलापूरचे न्युरोसर्जन): कालच आत्महत्या केली. एक यशस्वी डॉक्टर, समाजात मान असलेली व्यक्ती.

बाबासाहेब मनोहरे (लातूरचे मनपा आयुक्त): स्वतःवर गोळी झाडली, सध्या अत्यवस्थ.

भैयू महाराज: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, समाजसेवक – पण अचानक आत्महत्या.

डॉ. शितल आमटे: बाबा आमटे यांचं वारसत्त्व पुढे नेणाऱ्या, अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या.

सुशांत सिंह राजपूत: प्रतिभावान कलाकार, त्याच्या आत्महत्येने सारा देश हादरला.

पण या बाहेरच्या जगात जेवढं कौतुक, तेवढंच त्यांच्या वास्तव आयुष्यात एकटेपण होतं. घरातील नातेसंबंध, विचारांचे मतभेद, किंवा अव्यक्त अस्वस्थता – या सर्व गोष्टी त्या  कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास मनाला पोखरतो.

असे का घडतय ?

१. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष:
डिप्रेशन, ऍन्झायटी, बर्नआउट हे सilent killers आहेत. समाजात प्रतिष्ठा जपताना हे कुणालाही सांगता येत नाही.

२. एकटेपण आणि आंतरिक संघर्ष:
गोंधळातही माणूस एकटा असतो. virtual जगात सक्रिय असूनही, घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते.

३. समाजाच्या अपेक्षा आणि दबाव:
तू इतका मोठा आहेस, तुला काय कमी

४. वैयक्तिक आयुष्यातील तणाव:
कौटुंबिक मतभेद, नात्यातील क्लेश.

५. मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझं:

आपण काय शिकायला हवं?
मानसिक आरोग्यावर खुलेपणानं बोलणं.

केवळ बाहेरच्या जगात न अडकता खरे नातेसंबंध जपणं.

आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं.

एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतंय, त्याचा अर्थ तो माणूसही एकदम ठिक आहेच असं मानू नका

शेवटी, माणूस मनाने आनंदी असावा लागतो.

साभार शेख सालार

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button